सातारा : साताऱ्यामधून (Satara Crime) वडील आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. दोन दिवसांपूर्वी साताऱ्यातील हिवरे इथं सहावीत शिकणाऱ्या मुलाचा मृतदेह ऊसाच्या फडात आढळून आला होता. त्यामुळे परीसरात एकच खळबळ उडाली होती. शनिवारी मुलाच्या वडिलांनी पोलिसात खूनाची फिर्याद दिली होती. यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता वडिलांनीच खून केल्याचे समोर आले.
काय आहे नेमके प्रकरण?
विक्रम खताळ या 12 वर्षांच्या मुलाचा मृतदेह ऊसाच्या फडात आढळून आला होता. या घटनेनंतर पोलिसांनी वेगाने तपास केला. सोमवारी रात्री वडिलांनी गुन्ह्याची कबुली देत आपणच खून केल्याचे कबुल केले.15 दिवसांपूर्वी आरोपी विजयने स्वत:चे वजन केल्यानंतर ते 20 किलो कमी झाल्याचं लक्षात आलं. त्यानंतर आपल्याला कॅन्सरसारखा गंभीर आजार झाल्याचं समजून आपण मरणार अशी भीती मनात निर्माण झाली. आपल्या मृत्यूनंतर मागे मुलाचे काय होणार? त्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागेल या विचारातून त्याने आपल्या मुलाला ठार मारण्याचे ठरवले.
यानंतर तो पत्नी आणि मुलाला घेऊन शेतात गेला. यावेळी पत्नी लाकडे काढण्यासाठी गेली असता मुलगा विक्रमला घेऊन विजय ऊसाच्या शेतात घेला. तेव्हा विजयने मुलाला म्हटलं की, आपण गरीब आहे आणि लोक भरपूर त्रास देतील. तुला कोण काही बोललं तर न घाबरता.. असं म्हणत विजयने आपला मुलगा विक्रम याचा दोरीने गळा आवळला. दरम्यान, पत्नी घरी गेली आणि अजून दोघे न परतल्याने त्यांना फोन केला. तेव्हा विजयने विक्रम त्याचे चप्पल शेतात राहिल्याचं सांगत तो आणायला गेल्याचं आपल्या पत्नीला सांगितले.
विक्रमचा खून केल्यानंतर त्याचं चप्पल शेताच्या बांधावर टाकलं आणि त्यानंतर गुन्ह्यात वापरलेली दोरी गोठ्यात जनावराला बांधली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर आणि चौकशीनंतर त्यांना वडील विजयवर संशय आला. यानंतर त्यांनी त्याची कसून चौकशी केली असता विजयनेच मुलगा विक्रमचा खून केल्याचे समोर आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. यानंतर विजयला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला 29 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Accident News : दाट धुक्याने केला घात! 3 बस, 2 कार अन् ट्रकचा विचित्र अपघात
Punit Balan : पुनित बालन ग्रुप ईगल्सने पटकावले वर्ल्ड टेनिस लीगचे विजेतेपद
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले YouTube वर सर्वाधिक फॉलोअर्स असणारे जगातील पहिले नेते
RBI Threat : खळबळजनक ! मुंबईतील RBI चे मुख्यालय उडवून देण्याची मेलद्वारे देण्यात आली धमकी
ST News : एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच सुरु करण्यात येणार ‘ही’ सेवा
Ajit Pawar : ‘जितक्या जागा शिंदे गटाला तितक्याच जागा आम्हाला द्या, अजित पवार गटाची मागणी
Dhangar Reservation : धनगर आरक्षणासाठी आष्टी येथील तरुणाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये विद्यार्थ्यांनी भरलेल्या एसटीचा भीषण अपघात