पुणे : पुण्यातून (Pune Crime) एक चोरीची घटना समोर आली आहे. यामध्ये चांदीची मूर्ती घेण्याच्या बहाण्याने दुकान मालकाला बोलण्यात गुंतवून सहकाऱ्याने दुकानातील ड्रॉव्हर मध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. ही संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या चोरटयांनी 19 लाख 18 हजार 350 रूपयांचे दागिने चोरले. ही चोरीची घटना येरवडा बाजार येथील महावीर ज्वेलर्स या ठिकाणी घडली आहे.
याप्रकरणी राकेश गोपीलाल जैन (वय-44 रा. नीता पार्क कोपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, विमानतळ रस्ता, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अज्ञात सहा चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास महावीर ज्वेलर्स या दुकानात घडली. महावीर ज्वेलर्सचे मालक राकेश जैन हे सकाळी अकराच्या सुमारास एकटे असताना सहा चोरटे सोने खरेदीच्या बाहण्याने महावीर ज्वेलर्स मध्ये आले.
यातील एकाने मुलीसाठी अंगठी पाहिजे असल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादी जैन यांनी अंगठी दाखवली असता त्याने ती बघून परत केली. त्यानंतर टोळक्यातील दुसऱ्याने चांदीची मूर्ती पाहिजे असल्याचे फिर्यादी जैन यांना सांगितले. त्यामुळे जैन काऊंटरवरुन उठून बाजूला असलेल्या शोकेस मधील मूर्ती दाखवायला गेले. याचदरम्यान चोरटयांनी आपला डाव साधला. जैन यांना बोलण्यात गुंतवून ठेवत इतर चोरट्यांनी काउंटरच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या पॅकेटमधील सोन्याची चैन, मंगळसूत्र, सोन्याच्या 9 अंगठ्या असा एकूण 19 लाख 18 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.ही संपूर्ण चोरीची घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याच सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune Crime : पुण्यात कोयता गँगची दहशत; किरकोळ वादातून टपरी चालकावर हल्ला
Murlidhar Mohol : गणेश मंडळांसह नवरात्रौत्सव आणि ढोल-ताशा पथकांचा मुरलीधर मोहोळ यांना जाहीर पाठिंबा
Pune News : पतीच्या ‘त्या’ त्रासाला कंटाळून पत्नीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल
Dharashiv Video : मद्यधुंद पोलिसाने मतदान केंद्रावर घातला गोंधळ; Video व्हायरल
Pune Crime : डीवाय पाटील कॉलेजमध्ये 2 गटांमध्ये जोरदार राडा; एकमेकांवर केला जीवघेणा हल्ला
Weather Update : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस आणि गारपीठ; हवामान विभागाकडून अलर्ट जारी
Sangeeth Sivan : प्रसिद्ध दिग्दर्शक संगीत सिवन यांचं निधन
Ajit Pawar : शरद पवार त्यांना हवं तसं करतात अजित पवारांचे मोठे वक्तव्य
Pune Crime : धक्कादायक ! पुण्यात 20 जणांच्या टोळक्यांकडून 2 तरुणावर जीवघेणा हल्ला