Video

Pune Crime : मैत्रिणींचे तसले व्हिडिओ काढून आपल्या मित्राला पाठवायची; पुण्यातील ‘या’ कॉलेजमध्ये घडला धक्कादायक प्रकार

632 0

पुणे : पुण्यामधून (Pune Crime) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे कॉलेजमध्ये विद्यार्थीनींचे चोरून व्हिडीओ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थीनींच्या हॉस्टेलमध्ये काढलेले हे व्हिडीओ आरोपी तरुणी आपल्या मित्रांना पाठवत होती. या संपूर्ण प्रकरणामुळे कॉलेजमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
आर्या गिरीश काळे आणि विनीत सुराणा अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी आर्या हिने हॉस्टेलमध्ये चोरून विद्यार्थीनींचे व्हिडीओ शूट केले. ते व्हिडीओ ती मित्र विनीत सुराणा याला पाठवायची. यानंतर हे दोघे सोशल मीडियावर या विद्यार्थीनींचे व्हिडिओ टाकत होते. याप्रकरणी आर्या आणि विनीत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीईओपी कॉलेजच्या विद्यार्थीनींच्या हॉस्टेलमध्ये मुलींचे कमी कपड्यातले व्हिडीओ आर्या शूट करायची. ते व्हिडीओ मित्र विनीतला पाठवत असे. या प्रकरणी सीईओपी प्रशासनाने चौकशी सुरू केलीय. तसंच पोलिसात दोघांविरुद्ध तक्रार देण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत आर्या गिरीश काळे या विद्यार्थिनीला निलंबीत करण्यात आल्याचे सीईओपी कॉलेजकडून सांगण्यात आले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Pune Crime : डीवाय पाटील कॉलेजमध्ये 2 गटांमध्ये जोरदार राडा; एकमेकांवर केला जीवघेणा हल्ला

Weather Update : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस आणि गारपीठ; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Sangeeth Sivan : प्रसिद्ध दिग्दर्शक संगीत सिवन यांचं निधन

Ajit Pawar : शरद पवार त्यांना हवं तसं करतात अजित पवारांचे मोठे वक्तव्य

Pune Crime : धक्कादायक ! पुण्यात 20 जणांच्या टोळक्यांकडून 2 तरुणावर जीवघेणा हल्ला

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!