पुण्यात रविवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांच्यावर कोयता गँगनं हल्ला केला. पुण्यात गुंडांकडून पोलिसांवर हल्ले होणं हा समाजाच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनला असून मागील दीड वर्षात 48 पोलिसांवर हल्ले झाले असल्याचं पुढे आलं आहे
सदरक्षणाय खलदीग्रहणाय हे ब्रीदवाक्य घेऊन सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुर्जनांच्या विनाशासाठी महाराष्ट्र पोलीस नेहमीच कार्यरत असतात. मात्र हे पोलीसच सुरक्षित नसल्याचं समोर आला आहे पुणे शहरात मागील अनेक दिवसांपासून कोयता गँग सक्रिय झाली असून आता या कोयता गॅंग ची मजल थेट पोलिसांवर हल्ले करण्यापर्यंत पोहोचली आहे…
वर्दीवर असलेल्या पोलिसांवर हल्ला करण्यापर्यंत या गुंडांची मजल गेली आहे नागरिकांना सुरक्षेची हमी देणारे पोलीसच पुणे शहरात सुरक्षित नसल्याचं उघड झालं असून यामध्ये वाहतूक विभागातील पोलिसांचा प्रमाण अधिक आहे मारहाण करण्यापासून ते अगदी वर्दी फाडण्यापर्यंतचे प्रकार पुण्यात विविध ठिकाणी घडले आहेत.
पुण्यात जुलै महिन्यात वाहतूक विभागातील एका महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकाला अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता मध्य प्राशन करून गाडी चालवणाऱ्या एका दारुड्याने हे कृत्य केलं होतं मात्र पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने मोठा अनर्थ देखील टळला होता.
नागरिकांना सुरक्षिततेची हमी देणारे पुणे पोलीस सध्या सुरक्षित नसल्याचं पाहायला मिळत असून राज्याच्या गृह विभागाने याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे..