आमच्या लेकीबाळींच्या सुरक्षेसाठी शस्त्र परवाना मिळण्या साठी पोलीस आयुक्तांकडे अर्ज केला.
पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर प्रियदर्शनी वुमन्स फोरम, बीटीया फाउंडेशन, महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या काही पदाधिकारी मिळून पुणे शहराचे पोलीस आयुक्त माननीय अमितेश कुमार यांच्या कडे आम्हा महिलांच्या, मुलींच्या संरक्षणासाठी शस्त्र परवाना मिळावा यासाठी अर्ज केला आहे
साहेब आपण पुण्यातील सर्व शाळा मुख्यधापक तसेच कॉलेज प्रिन्सिपॉल स्टाफ ह्यांची एक मोठी मीटिंग लावून एक त्यांना आचारसंहिता बनवून द्यावी जेणे करून आमच्या मुलीबाळी सुरक्षित राहतील.नाहीतर आम्हाला शस्त्र परवाना द्या आम्ही ह्या विकृत लोकांना शिक्षा करतो.कारण सध्या हाच मार्ग आम्हाला दिसत आहे असं मत संगीता तिवारी यांनी व्यक्त केलं आहे.
आता सर्व सुरक्षेचे उपाय करीत आहोत आणि तसे सर्व पोलीस स्टेशन पोलीस अधिकारी ह्यांना आदेश दिले आहेत अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शिष्टमंडळाला दिले आहेत
यावेळी बिटिया फाउंडेशन च्या अध्यक्ष संगीता तिवारी, एक्समहाराष्ट्र प्रदेश सचिव शोभाताई पंनिकर, रमा भोसले ब्लॉक अध्यक्ष, कांता ढोणे प्रभाग अध्यक्ष, बेबी राऊत महासचिव, सुनिता नेमुर सचिव या सर्व उपस्थित होत्या.