सचिन वाझेंच्या पुनर्नियुक्ती प्रकरणी परमबीर सिंह यांचा धक्कादायक गौप्यस्फोट

484 0

मुंबई- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सचिन वाझेला पुन्हा मुंबई पोलीस दलात नियुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पर्यावरण मंत्री यांचा दबाव होता असा धक्कादायक खुलासा ईडी समोर दिलेल्या जबाबामध्ये केला आहे. परमबीर सिंग यांच्या खुलाशामुळे महाविकास आघाडी सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

सचिन वाझेला पुन्हा मुंबई पोलीस दलात नियुक्त करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दबाव होता. शिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट सूचना दिली होती असा जबाब परमबीर सिंह यांनी ईडीला दिला आहे. त्याशिवाय बदल्यांची यादी परिवहन मंत्री अनिल परब स्वत: घेऊन येत असल्याचेही परमवीर सिंह यांनी म्हटले आहे. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात ही माहिती समोर आली आहे.

अनिल देशमुख मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा जबाब नोंदवला होता. सचिन वाझे याला पुन्हा पोलीस दलात रुजू करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला उत्तर देताना परमबीर यांनी धक्कादायक माहिती दिली. सचिन वाझे याला जून 2020 मध्ये पुन्हा पोलीस दलाच्या सेवेत रुजू करण्यात आले होते. निलंबित पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस दलात रुजू करुन घेण्याच्या निर्णयासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पोलीस आयुक्त, सहआयुक्त आणि काही अधिकारी होते. हे सर्वजण संबंधित समितीचे सदस्य होते.

या बैठकीच्या दरम्यान सचिन वाझे यांची नियुक्ती करण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दबाव होता. त्याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची थेट सूचना होती असेही परमबीर यांनी ‘ईडी’ला सांगितले.

Share This News

Related Post

गुगल मॅपचा यु टर्न; संभाजीनगरचे पुन्हा औरंगाबाद

Posted by - July 23, 2022 0
शिंदे भाजपा सरकारने मंत्रीमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नाव देण्याच्या निर्णयाला मंजूरी दिली होती. मात्र, केंद्राकडून…

मोठी बातमी ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा

Posted by - March 23, 2022 0
महिला राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा म्हणून रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेतल्याने पक्षाच्या पदाची…

निर्मलवारीसाठी पुणे जिल्हा परिषदेची यंत्रणा सज्ज

Posted by - June 11, 2023 0
  पुणे: जिल्हा परिषदेने मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्मलवारीसाठी यंत्रणा सज्ज ठेवली असून जगद्गुरू संत तुकाराम पालखी…

पंढरपुरात खासदार धनंजय महाडिक यांना मोठा धक्का; 11 पैकी सात ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीची सत्ता

Posted by - December 20, 2022 0
पंढरपूर : राज्यात आज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा टप्प्याटप्प्याने निकाल जाहीर होतो आहे. आज राज्यातील 7000 हुन अधिक ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर…

पुण्याच्या राजकारणातील संयमी व्यक्तिमत्त्व ‘अनिल शिरोळे’…

Posted by - September 13, 2022 0
पुणे : पद्माकर गुलाबराव शिरोळे उर्फ अनिल शिरोळे पुणे शहराच्या राजकारणातील एक सभ्य सुसंस्कृत आणि चारित्र्यवान नेता… 2019 मध्ये अनिल…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *