ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

1116 0

मुंबई- मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन झाले आहे. मुंबईतील धीरूभाई अंबानी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी अभिनेत्री सीमा देव, अभिनेते अजिंक्य देव आणि दिग्दर्शक अभिनय देव आणि नाती आर्य देव आणि अनया देव आहेत.

रमेश देव यांच्या निधनाची बातमी अभिनेते अजिंक्य देव यांनी दिली आहे. रमेश देव यांनी हिंदी, मराठी चित्रपटातून, मराठी नाटकांमधून रंगवलेला नायक खलनायक आजही रसिकांच्या स्मरणात आहे.

तीन दिवसांपूर्वी त्यांचा 93 वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. यावेळी चाहत्यांनीही त्यांच्या दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. रमेश देव यांची अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक म्हणून ओळख आहे.

त्यांचा जन्म 30 जानेवारी 1929 कोल्हापूर येथे झाला. जुन्या मराठी, हिंदी सिनेमात त्यांनी नायक, खलनायक रंगवला आहे. त्यांच्या पत्नी सीमा देव या देखील अभिनेत्री असून या दोघांनी जोडीने अनेक सिनेमामधून भूमिका केल्या आहेत. हृषीकेश मुखर्जी याच्या आनंद सिनेमात रंगवलेला डॉक्टर अनेकांच्या आजही स्मरणात आहे.

 

1956 साली रमेश देव यांनी आंधळा मागतो एक डोळा या चित्रपटातून चित्रपटक्षेत्रात प्रवेश केला. तर आरती हा त्यांचा हिंदीमधील पहिला चित्रपट होता. त्यांनी ‘या सुखांनो या’ या मराठी चित्रपटाची निर्मिती देखील केली आहे.

Share This News

Related Post

रेल्वे प्रवाशांनो, आता नियोजित ट्रेनच्या एक तास आधी यावं लागणार स्टेशनवर !

Posted by - December 16, 2022 0
पुणे : तुम्ही पुण्यातून रेल्वेनं प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. यापुढं रेल्वे प्रवाशांना विमानातळा प्रमाणंच रेल्वे…

पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाचे अपूर्ण काम लवकरच पूर्ण करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

Posted by - March 16, 2023 0
मुंबई : पुणे जिल्ह्यातील अपूर्ण राहिलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम (पीएन 25) लवकरच पूर्ण करण्यात येईल. पावसाळ्यापूर्वी 1200 मीटर रस्त्याचे, तर…

आरती सुरु असताना 100 वर्ष जुने कडुलिंबाचं झाड कोसळले, ७ जण दगावले

Posted by - April 10, 2023 0
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातुन एक धक्कादायक घटना घडली आहे. पारस येथील बाबूजी महाराज मंदिरात आरती सुरू असतानाच 100 वर्ष जुनं…

‘धोका पत्करुन मी शस्त्रक्रिया केली’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसैनिकांना भावनिक साद

Posted by - April 30, 2022 0
मुंबई- तुमच्यासोबत फिरण्यासाठी धोका पत्करुन मी शस्त्रक्रिया केली. आता मी महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. शिवसेना इतरांपेक्षा वेगळी आहे हे दाखवण्यासाठी…

जिओकडून “कॅलेंडर मंथ व्हॅलिडिटी” योजना सादर

Posted by - March 28, 2022 0
एका रिचार्जवर पूर्ण महिन्याची वैधता “कॅलेंडर मंथ व्हॅलिडिटी” योजना सादर करणारी जिओ पहिली टेलिकॉम ऑपरेटर कंपनी ठरली आहे. या योजनेमध्ये…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *