Pune News

Pune News : पुणे इसिस मॉड्युल प्रकरणातील पुण्यातून फरार झालेला ‘तो’ दहशतवादी NIA च्या ताब्यात

458 0

पुणे : पुणे इसिस मॉड्युल प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या (Pune News) ताब्यातून पळून गेलेल्या दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) त्याला अटक केली गेली आहे. पुणे इसिस मॉड्युल प्रकरणातील ही आठवी अटक आहे. दहशतवादी शाहनवाज आलम याला झारखंडमधून अटक झाली आहे, तो पुण्यातून पळून गेला होता. स्फोटक बनवण्याचं प्रशिक्षण देणं, ट्रेनिंग कॅम्प आयोजित करणं या प्रकरणांमध्ये तो वॅान्टेड होता.

त्याच्याविरुद्ध दिल्लीत दहशतवादी कृत्य केल्याचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. गेल्याच महिन्यात दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने त्याला अटक केली होती. त्यानंतर आता एनआयएने पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून त्याला अटक केली आहे. जुलै महिन्यात कोथरूड येथे दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. यादरम्यान शाहनवाज आलम हा पुणे पोलिसांना चकमा देऊन फरार झाला होता.

त्याचा अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय सहभाग होता. लपण्याचं ठिकाण शोधण्यापासून शस्त्र चालवण्याचे आणि स्फोटकांचे सराव वर्ग आयोजित करण्यात आलमचा सहभाग होता. पुण्यातून फरार झालेल्या मोस्ट वॅान्टेड दहशतवादी आलमला महिनाभरापूर्वी दिल्ली पोलिसांनी अटक केली. एनआयएने या दहशतवाद्यावर तीन लाख रुपयांचे बक्षीसदेखील ठेवले होते. दहशतवादी शाहनवाज आलम हा इंजिनिअर आहे.

Share This News

Related Post

ब्रेकिंग न्यूज, मुंबै बँकेतील बोगस मजूर प्रकरणी प्रवीण दरेकर यांच्या विरोधात गुन्हा

Posted by - March 15, 2022 0
मुंबई- मुंबै बँकेतील बोगस मजूर प्रकरणी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्यावर माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…
Tushar Doshi

IPS Tushar Doshi : जालना एसपी तुषार दोषींची पुन्हा बदली; ‘या’ ठिकाणी केली पोस्टिंग

Posted by - November 25, 2023 0
मुंबई : आयपीएस अधिकारी तुषार दोशींची (IPS Tushar Doshi) पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. पुणे सीआयडीमधून त्यांना आता पुणे…

महाराष्ट्रात विद्यापीठ खुल्या निवडणुका पुन्हा सुरू कराव्यात- अभाविपची मागणी 

Posted by - March 18, 2023 0
पुणे: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री याज्ञवल्क्य शुक्ल दिनांक १७ मार्च २०२३ ला पुणे शहरात प्रवासासाठी आले. यावेळी, भारतातील…

राष्ट्रवादीपाठोपाठ भाजपात भाकरी फिरली! प्रदेश कार्यकारिणी जाहीर

Posted by - May 3, 2023 0
मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे असं सूचक विधान करत नुकताच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून…
Pune Crime

Pune Crime : WhatsApp द्वारे चालवल्या जाणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश

Posted by - January 25, 2024 0
पुणे : पुण्यातून (Pune Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये WhatsApp द्वारे चालवल्या जाणाऱ्या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा गुन्हे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *