Gadchiroli News

Gadchiroli News : मोठी बातमी! माओवाद्यांकडून ‘या’ भाजप नेत्याची निर्घृणपणे हत्या

550 0

गडचिरोली : गडचिरोलीमधून (Gadchiroli News) एक मोठी बातमी समोर आली आहे. माओवाद्यांकडून एका भाजप नेत्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. छत्तीसगडच्या मोहल्ला मानपूर जिल्ह्यातील एका गावामध्ये माओवाद्यांनी भाजप नेत्याची हत्या केली आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या छत्तीसगडच्या हद्दितील सारखेडा गावामध्ये रात्रीच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. बिरजू तारम असे हत्या करण्यात आलेल्या नेत्याचे नाव आहे.

काय घडले नेमके?
गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या छत्तीसगडच्या हद्दितील सारखेडा गावात रात्री उशिरा बिरजू तारम यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेत बिरजू तारम यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचं आवाहन माओवाद्यांकडून करण्यात आलं आहे. लोकांमध्ये दहशत निर्माण व्हावी आणि त्यांनी निवडणुकीवर बहिष्कार घालावा या उद्देशातून ही हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.

ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माओवाद्यांकडून दहशत पसरवण्याचा प्रयत्न होत असल्यानं. निवडणूक सुरक्षित वातावरणात पार पाडण्याचं मोठं आव्हान आता प्रशासकीय यंत्रणांसमोर असणार आहे. बिरजू तारम यांची हत्या झाली ते ठिकाण गडचिरोली जिल्ह्यापासून अवघ्या काही किलोमीटर अतंरावर असल्याने गडचिरोली पोलीस देखील सतर्क झाले आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!