बीड : बीडमधून (Beed News) एक मोठी बातमी समोर आली आहे. या घटनेमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. दिवंगत लोकनेते विनायक मेटे यांच्या पुतण्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले आहे. बीडच्या राजेगाव परिसरात ही घटना घडली आहे. सचिन त्रिंबक मेटे असं विनायक मेटे यांच्या या पुतण्याचं नाव आहे. सचिन यांनी आत्महत्या का केली? हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
काय घडले नेमके?
विनायक मेटे यांच्या पुतण्यानं आत्महत्या केली आहे. सचिन त्रिंबक मेटे (वय 34) असं त्यांचं नाव आहे. सचिन यांनी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. बीडच्या राजेगाव परिसरात ही घटना घडली आहे. दरम्यान सचिन यांनी टोकाचं पाऊल का उचललं? हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.
सचिन यांच्या आत्महत्येची बातमी समाजात बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी टोकाचं पाऊलं का उचललं याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यांनी अचानक टोकाचे पाऊल उचलल्यामुळे मेटे कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.