Mulshi Accident

Mulshi Accident : मुळशीतील पिरंगुट घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पोचा भीषण अपघात

530 0

मुळशी : सध्या राज्यात अपघाताचे प्रमाण वाढताना दिसत आहे. चालकाच्या चुकीमुळे हे अपघात होत असतात. मुळशीतील (Mulshi Accident) पिरंगुट घाटातदेखील असाच अपघात झाला आहे. भरधाव टेम्पोने यामध्ये अनेक वाहनांना धडक दिली आहे. या संपूर्ण अपघाता व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

काय घडले नेमके?
मुळशी तालुक्यातील कोलाड पुणे महामार्गावर पिरंगुट घाटामध्ये हा भीषण अपघात झाला आहे. तीव्र उतारावर एका मालवाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं त्याने अनेक वाहनांना धडक दिली आहे. या अपघातात अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या भरधाव टेम्पोने पाच दुचाकी आणि एका कारला धडक दिली आहे. या अपघातानंतर टेम्पोचालक फरार झाला आहे. या अपघातात सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पुणे हादरलं! मध्यरात्रीच्या सुमारास पाठलाग करून तरुणाची निर्घृणपणे हत्या

Wardha News : तपासणीसाठी आलेल्या मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्याचा धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू

Pune Accident News : गाडीवरील नियंत्रण सुटल्याने पुण्यतील डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!