Fake Notes

Solapur News : सोलापूरमध्ये सापडला बनावट नोटांचा छापखाना; घरातून जप्त केल्या 5 लाखांच्या नोटा!

1060 0

सोलापूर : काही दिवसांपूर्वी अभिनेता शाहीद कपूरची फर्जी नावाची सिरीज मोठ्या प्रमाणात गाजली होती. या सिरीजमध्ये शाहीदने ज्या प्रकारे बनावट नोटा छापल्याचे दाखवण्यात आले होते. असाच एक धक्कादायक प्रकार सोलापुरात घडला आहे. यामध्ये पोलिसांनी तब्बल 5 लाख रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांकडून जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?
बार्शी या ठिकाणी बनावट नोटा खपवण्यासाठी आलेल्या चौघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास केला असता या बनावट नोटांच्या छापखान्याची माहिती मिळाली. मोहोळ तालुक्यात बनावट नोटा छापखाना चालवला जात होता.

Satara News : संतापजनक ! मायलेकीला कपडे फाटेपर्यंत मारहाण; साताऱ्यामधील घटना

मोहोळ येथील चिंचोली काटी गावात एका तरुणाच्या घरावर छापा टाकून अर्धवट छापलेल्या 4 लाख रुपयांचे बंडल पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुनील कोथिंबीर, आदित्य सातभाई, खादीर जमाल शेख, विजय वाघमारे, नितीन बागडे, जमीन सय्यद, ललित व्होरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!