Sangli Crime News

Sangli Crime News : सांगलीतील कुख्यात गुंड सच्या टारझनची घरात घुसून हत्या

31130 0

सांगली : सांगलीमध्ये (Sangli Crime News) आज सकाळी घरात घुसून पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार, नामचीन गुंड सचिन ऊर्फ सच्या टारझन याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. कुपवाडमधील अहिल्यानगर या ठिकाणी ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित हल्लेखोर गणेश मोरे याला ताब्यात घेतले आहे. हा खून नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

Chhatrapati Sambhajinagar : जिवलग मित्रांचं जेवण ठरलं अखेरचं ! रस्ते अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू

काय घडले नेमके?
सच्या टारझन पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, खुनाचे प्रयत्न यांसह अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. नगरसेवक दाद्या सावंत याच्या खुनाच्या गुन्ह्यात तो सध्या जामिनावर बाहेर आला होता. सोमवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास काही अज्ञात तरुण सच्या टारझन याच्या घरात शिरले आणि त्याच्यावर हा प्राणघातक हल्ला केला. सच्या याच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून काही मिनिटातच हल्लेखोर तेथून पसार झाले.

यानंतर तातडीने सच्या टारझन याला सांगलीच्या (Sangli Crime News) शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सच्या टारझनवर खुनी हल्ला झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. सकाळी 10 वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी कुपवाड पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!