Satara News

Satara News : संतापजनक ! मायलेकीला कपडे फाटेपर्यंत मारहाण; साताऱ्यामधील घटना

781 0

सातारा : साताऱ्यामध्ये (Satara News) माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये साताऱ्यात (Satara News) फलटणमधील कुरवली खुर्द या गावात ही घटना घडली आहे. या प्रकरणात मायलेकीला संपूर्ण गावासमोर मारहाण करण्यात आली. या मारहाणीत दोघींचे कपडेही फाटले. त्या दोघींना फरफटत नेल्याची माहितीसुद्धा समोर आली आहे. मुलांच्या भांडणातून हा प्रकार घडला आहे.

Chhatrapati Sambhajinagar : जिवलग मित्रांचं जेवण ठरलं अखेरचं ! रस्ते अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू

काय घडले नेमके?
कुरवली खुर्द या ठिकाणी काल सायंकाळी ही मारहाणीची घटना घडली. यावेळी दोघींना फरफटत नेण्यात आलं यामध्ये त्या दोघींचेही कपडे फाटले. संबंधित महिला विधवा असून तिची मुलगी 16 वर्षांची आहे. घटनेनंतर मायलेकींची तक्रार पोलिसांनी घेतली नसल्याचा आरोपदेखील करण्यात आला आहे. यानंतर फलटण पोलिसांनी सकाळी पीडित महिलेसह मुलीला पोलीस ठाण्यात आणले. पोक्सा आणि अ‍ॅट्राॅसीटी अंर्तगत मारहाण करणा-यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

शाळकरी मुलांमध्ये क्रिकेटच्या कारणावरून किरकोळ वाद झाला होता. त्याच वादातून ही मारहाणीची घटना घडली असल्याचे पीडित महिलेने आणि तिच्या मुलीने आपल्या जबाबात म्हंटले आहे. फलटण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Share This News

Related Post

Eknath Shinde

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचे 16 आमदार पात्र – राहुल नार्वेकर

Posted by - January 10, 2024 0
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून शिवसेना (Shivsena) आमदार अपात्रता प्रकरणावर अंतिम निकाल दिला. शिवसेना…

‘हिम्मत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावाने मतं मागा’ ; उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल

Posted by - June 25, 2022 0
मुंबई – हिम्मत असेल तर स्वत:च्या बापाच्या नावाने मतं मागा, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे…
Murlidhar mohol

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

Posted by - January 27, 2022 0
पुणे- राज्यासह पुणे शहरात देखील कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्यानं वाढ होताना दिसून येत आहे. सामान्य नागरिकांपासून ते स्थानिक लोकप्रतिनिधी, बॉलिवूड स्टार्स,…

भारतीय जनता पार्टी : मुरलीधर मोहोळ यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी ; प्रदेश कार्यकारिणीत स्थान

Posted by - September 15, 2022 0
मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी मुरलीधर मोहोळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासह एड. माधवी नाईक…

माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाकडून जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या मंदिर निर्मितीसाठी दिड कोटीचा धनादेश सुर्पूत

Posted by - October 1, 2022 0
पुणे: “आपले हात हे घेण्यासाठी नाही तर देण्यासाठी सुध्दा असतात. याच न्यायानुसार उदार अंतःकरणाने मदत करावी. भंडारा डोंगर येथे उभारण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *