IND Vs AUS

IND vs AUS : वर्ल्ड कपच्या फायनलसाठी पीएम मोदींसह ‘हे’ दिग्गज नेते राहणार उपस्थित

380 0

अहमदाबाद : भारताने वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करत फायनल (IND vs AUS) गाठली आहे. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भारत एकही सामना हरलेला नाही. वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारतानं न्यूझीलंडवर सत्तर धावांनी विजय मिळवला तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला. त्यामुळे आता वर्ल्ड कपचा फायनल सामना भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये (IND vs AUS) रविवारी पार पडणार आहे. तब्बल 20 वर्षांनंतर या दोन्ही टीम फायनलमध्ये एकमेकांशी भिडणार आहेत. हा सामना गुजरातच्या अहमदाबादमध्ये होणार आहे.

फायनलसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी राहणार उपस्थित
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील फायनल सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान देखील हजर राहणार आहेत. याबाबत गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

काय लिहिले ट्विटमध्ये ?
‘रविवारी अहमदाबाद येथे वर्ल्ड कपचा अंतिम सामना होणार आहे. या सामन्यासंदर्भात स्वच्छता, वाहतूक, सुरक्षा अशा विविध बाबींचा व्यापक आढावा गांधीनंगरमध्ये झालेल्या एका उच्चस्थरीय बैठकीत घेण्यात आला. हा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. केंद्र सरकारचे इतर मंत्री आणि काही राज्यांचे मुख्यमंत्री देखील हा सामना पाहाण्यासाठी येऊ शकतात’ असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Aaditya Thackeray : सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आदित्य ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल

UPI Payment : UPI युजर्ससाठी महत्वाची बातमी ! 31 डिसेंबरच्या आधी करा ‘हे’ काम अन्यथा यूपीआय नंबर होईल बंद

Kolhapur News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला हिंसक वळण; उसाचा ट्रॅक्टर पेटवला

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!