नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कुवेतमध्ये एक मोठी दुर्घटना (Kuwait Building Fire) घडली आहे. या ठिकाणी कुवेतमधील मंगफ येथे लेबर कॅम्पला भीषण आग लागली. या आगीत 40 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे मृतांमध्ये भारतीयांचादेखील समावेश आहे. या दुर्घटनेत 40 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. त्यामुळं मृतांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे.
काय घडले नेमके?
कुवेतच्या दक्षिण अहमदी प्रांतातील मंगफ भागात बुधवारी पहाटे सहा मजली इमारतीला आग लगाली. हा परिसर लेबर कॅम्प म्हणून ओळखला जातो. ज्या इमारतीत ही आग लागली त्या इमारतीत राहणारे बहुसंख्य कामगार हे भारतीय होते. या इमारतीत जवळपास 160 लोक राहत होते. हे सर्व एकाच कंपनीचे कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे.
भारतीय दूतावासाकडून हेल्पलाईन नंबर जारी
भारतीय दूतावासाने या दुर्घटनेतील जखमींना तात्काळ मदत मिळावी तसेच दुर्घटनाग्रस्तांशी संपर्क साधता यावा यासाठी आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. +965-65505246 या हेल्पलाइनशी संपर्क साधावा असे आवाहन भारतीय दूतावासाकडून करण्यात आले आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Maharashtra Politics : विधानसभेसाठी मनसेनी केली ‘एवढ्या’ जागांची मागणी
Satara News : सातारा हादरलं! तरुणाला पेट्रोल अंगावर ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न
Weather Update : धोक्याची घंटा; महाराष्टात अतिमुसळधार पावसासोबत येणार ‘हे’ संकट
Pune Crime : धक्कादायक ! पुण्यात डंपरच्या धडकेत महिलेचा दुर्दैवी मृत्यू
Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये 23 मे रोजी घडलेल्या हिट अँड रन अपघाताचे CCTV फुटेज आलं समोर
Pune Crime News : धक्कादायक ! पुण्यामध्ये मायलेकराचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू
Pune News : ‘सुलतान’ लघुपटाची युरोपमधील आतंरराष्ट्रीय लघुपट महोत्सवासाठी निवड
Upendra Dwivedi : देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची नियुक्ती