पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) 23 मे रोजी घडलेल्या हिट अँड रन अपघाताचा CCTV व्हिडिओ समोर आला आहे. हिंजवडी येथील भुजबळ रस्त्यावर 23 मे रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास हा अपघात झाला होता. यामध्ये एका बेधुंद कार चालकाने रस्त्याकडेने चालणाऱ्या युवतीला उडवले होते. ही युवती कारची धडक बसल्याने 20 फूट हवेत उडाली. या अपघातात ती तरुणी गंभीर जखमी झाली आहे. या अपघाताचा व्हिडिओ आता समोर आला आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये 23 मे रोजी घडलेल्या हिट अँड रन अपघाताचे CCTV फुटेज आलं समोर pic.twitter.com/65OxdodcCB
— TOP NEWS MARATHI (@Topnewsmarathi) June 12, 2024
त्या तरुणीला धडक देणारा कारचालक हा मध्य धुंद नव्हता अशी माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली आहे. मात्र या प्रकरणात हिंजवडी पोलिसांनी आरोपी विरोधात अद्यापही गुन्हा दाखल केलेला नाही. खमी महिला मुंबईची असून तिने अद्याप या प्रकरणी तक्रार दाखल केलेली नाही. तरुणीची तक्रार आल्यानंतर आम्ही आरोपी विरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करू असं हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी सांगितल आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune Crime News : धक्कादायक ! पुण्यामध्ये मायलेकराचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू
Pune News : ‘सुलतान’ लघुपटाची युरोपमधील आतंरराष्ट्रीय लघुपट महोत्सवासाठी निवड
Upendra Dwivedi : देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची नियुक्ती