शिवकाशी : तामिळनाडूच्या शिवकाशीमध्ये आज फटाका फॅक्ट्रीमध्ये (Firecracker Factory) भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये 5 महिलांसह 8 मजुरांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. विरुधनगर जिल्ह्यातल्या शिवकाशीजवळ सेंगामालापट्टीमधल्या एका फटाका फॅक्ट्रीमध्ये हा स्फोट झाला. या स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस आणि अॅम्ब्युलन्स तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. या दुर्घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त करत जखमींना योग्य उपचार दिले जावेत, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या स्फोटानंतर फॅक्ट्रीच्या 7 खोल्यांमध्ये ठेवलेले फटाके जळून खाक झाले आहेत. निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळाल्यानंतर मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मदत केली जाईल, असे मुख्यमंत्री स्टालिन यांनी सांगितलं आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Ravindra Dhangekar : शिवसंग्राम फाउंडेशनचा रवींद्र धंगेकर यांना जाहीर पाठिंबा
Pune Crime : पुण्यात गोल्ड हाईस्ट ! सराफाला बोलण्यात गुंतवून दागिने केले लंपास
Pune Crime : पुण्यात कोयता गँगची दहशत; किरकोळ वादातून टपरी चालकावर हल्ला
Murlidhar Mohol : गणेश मंडळांसह नवरात्रौत्सव आणि ढोल-ताशा पथकांचा मुरलीधर मोहोळ यांना जाहीर पाठिंबा
Pune News : पतीच्या ‘त्या’ त्रासाला कंटाळून पत्नीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल
Dharashiv Video : मद्यधुंद पोलिसाने मतदान केंद्रावर घातला गोंधळ; Video व्हायरल
Pune Crime : डीवाय पाटील कॉलेजमध्ये 2 गटांमध्ये जोरदार राडा; एकमेकांवर केला जीवघेणा हल्ला
Weather Update : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस आणि गारपीठ; हवामान विभागाकडून अलर्ट जारी
Sangeeth Sivan : प्रसिद्ध दिग्दर्शक संगीत सिवन यांचं निधन
Ajit Pawar : शरद पवार त्यांना हवं तसं करतात अजित पवारांचे मोठे वक्तव्य
Pune Crime : धक्कादायक ! पुण्यात 20 जणांच्या टोळक्यांकडून 2 तरुणावर जीवघेणा हल्ला
Comments are closed.