Accident Viral Video

Accident Viral Video: ओव्हरटेक करणे पडले महागात; वडिलांचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी

930 0

तामिळनाडूमधील कोइम्बतूरमध्ये एक धक्कादायक घटना (Accident Viral Video) घडली आहे. यामध्ये बापलेकांना अति घाई नडली आहे. ओव्हरटेक करण्याच्या नादात वडिलांना आपला जीव गमवावा (Accident Viral Video) लागला तर मुलांना गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. असाच अपघात तमीळनाडूमध्ये झाला आहे.

Jalgaon Suicide : मम्मी, पप्पा…सॉरी… अशी चिट्ठी लिहून उच्चशिक्षित तरुणीने उचलले ‘हे’ पाऊल

ओव्हरटेक करण्याच्या नादात एका कारचालकाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या दुचाकीवरुन एक छोटा मुलगा आणि त्याचे वडील प्रवास करत होते. या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

वडिलांचा जागीच मृत्यू
ओव्हरटेक (Accident Viral Video) करणाऱ्या कारने बाईकला समोरुन जोरदार धडक दिली. ही धडक एवढ्या जोरात होती की यामध्ये वडिलांचा जागीच मृत्यू झाला आहे तर त्यांचा मुलगा 10 फूट हवेत उडाला. त्यांची बाईकही हवेत उडाली आणि यांच्या गाडीच्या मागून येणाऱ्या टोम्पो ट्रॅव्हलर गाडीची समोरची काच तोडून बाईक या गाडीमध्ये घुसली. दुचाकी चालकाला या टोम्पो ट्रॅव्हलर गाडीचा फटका बसला आणि ते रस्त्यावर रक्तबंबाळ होऊन पडले. यावेळी त्यांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा रस्त्याच्या एका बाजूला फेकला गेला. ही संपूर्ण अपघाताची घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

Share This News
error: Content is protected !!