जळगाव : आजकाल तरुणांमध्ये आत्महत्येचे प्रमाण खूप वाढले आहे. एका छोट्याशा अपयशामुळे किंवा एखाद्या शुल्लक कारणावरून हे आत्महत्या (Jalgaon Suicide) करत असतात. अशीच एक आत्महत्येची घटना जळगावमध्ये घडली आहे. यामध्ये ‘मम्मी- पप्पा, सॉरी. मी स्वतःच आत्महत्या करीत आहे. कुणालाही जबाबदार धरू नये,’ अशा आशयाची सुसाइड नोट लिहून जळगाव शहरातील रौनक कॉलनीतील उच्चशिक्षित युवतीने गळफास (Jalgaon Suicide) घेत आत्महत्या केली आहे. शुक्रवारी ही घटना घडली आहे. मात्र तिने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. कोमल वसंत भावसार (वय 30) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे.
Dispute : दुचाकीचा धक्का लागल्यानं दोन गटांत तुफान राडा; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
काय आहे संपूर्ण प्रकरण?
जळगाव शहरातील रौनक कॉलनी येथे कोमल कुटुंबीयांसोबत राहत होती. कोमल एका बँकेत नोकरीला होती. घटनेच्या दिवशी कोमलची आई आणि भाऊ हे पुण्याला गेले होते. तर इलेक्ट्रिशियन असलेले वडील शुक्रवारी नेहमीप्रमाणे सकाळी साडेआठ वाजता कंपनीत कामाला गेले होते. तर कोमलने कामावर सुट्टी घेतली आणि घरीच थांबली. यादरम्यान तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी वडील घरी आल्यावर, घराचा दरवाजा उघडताच त्यांना मुलगी कोमल गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. यानंतर त्यांनी मोठा आक्रोश केला. त्यांचा आक्रोश पाहून शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन कोमलचा मृतदेह खाली उतरवला.
Satara News : ‘खूप केलं माणसांसाठी आता बस्स’… व्हाट्सअॅप स्टेटस ठेवत तरुणाची आत्महत्या
लॅपटॉपच्या बॅगेत सापडली सुसाइड नोट
या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक अमोल मोरे, अल्ताफ पठाण यांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला. यादरम्यान त्यांना कोमलच्या लॅपटॉप बॅगमध्ये एक चिठ्ठी सापडली. ‘पप्पा, मम्मी सॉरी. मी स्वतःच आत्महत्या (Jalgaon Suicide) करीत आहे. कुणालाही जबाबदार धरू नये,’ असे तिने त्या चिट्ठीत लिहिले होते. या चिठ्ठीसह पोलिसांनी कोमलचा मोबाइल व लॅपटॉप ताब्यात घेतला आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून हेड कॉन्स्टेबल अल्ताफ पठाण या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.