सातारा : महाबळेश्वरमध्ये (Satara News) वेण्णालेक परिसरात गो-कार्ट रेसिंग करणे एका महिलेच्या जीवावर बेतले आहे. गो-कार्टिंग ट्रॅकवर बुक कटिंग करताना वाहनाच्या चाकात ओढणी अडकून गळफास लागल्यामुळं या (Satara News) महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. सना अमीर पेटीवाला (वय 24, रा. मिरारोड, मुंबई) असे मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना शनिवारी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली आहे.
संपादकीय ! दर्शनाचा बळी…म्हणे राहुल हंडोरेचे प्रेम होते…छे..! प्रेम कधी बळी घेतं का?
काय घडले नेमके?
मिरा रोड येथील सना अमीर पेटीवाला ही महिला पर्यटनासाठी महाबळेश्वर गेली होती. यावेळी सना यांची गो-कार्टिंग ट्रॅकवर बुक कटिंग ही साहसी भरधाव छोटी गाडी चालवण्याची इच्छा झाली. परंतु ही गाडी चालवताना त्यांची ओढणी गाडीच्या चाकात अडकल्याने सना गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर त्यांना स्थानिकांच्या मदतीने महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणाचा (Satara News) पुढील तपास महाबळेश्वरचे पोलीस निरीक्षक संदिप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धर्मेंद्र पावरा व पोलीस हवालदार संतोष शेलार करत आहेत.