Chhatrapati Sambhaji Nagar Accident

Chhatrapati Sambhaji Nagar Accident : दोन ट्रकमध्ये ओव्हरटेक करण्याच्या स्पर्धेमुळे 3 भावंडांना गमवावा लागला जीव

1337 0

छत्रपती संभाजीनगर : राज्यात अपघाताचे प्रमाण वाढतच चालले आहे. छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhaji Nagar Accident) एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातात तीन भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बीड बायपास परिसरातल्या बाळापूर फाट्यावर हायवा आणि दुचाकीमध्ये हा भीषण अपघात झाला आहे. प्रवीण अंभोरे, प्रतिभा अंभोरे आणि लखन अंभोरे अशी या अपघातात मृत पावलेल्या बहीण भावाची नावं आहेत.

काय घडले नेमके?
आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास बीड बायपासवरील बाळापूर फाटा परिसरातील पाटीलवाडा हॉटेल समोर आपल्या दुचाकीवरून अंभोरे बहिण भाऊ प्रवास करत होते. याचवेळी दोन हायवांमध्ये ओव्हरटेक करण्याची स्पर्धा सुरु होती. याच स्पर्धेच्या नादात दोन्ही पैकी एका हायवा चालकाने अंभोरे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. थेट अंगावरून हायवा गेल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे या अपघातानंतर हायवा चालक घटनास्थळावरून गाडीसह फरार झाला.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिन्ही मृतदेह शासकीय घाटी रूग्णालयात पाठवले. पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांकडून अपघात करणाऱ्या हायवा ट्रकचा शोध घेतला जात आहे. यासाठी पोलीस सीसीटीव्हीची पाहणी करत आहेत. आपल्या तरुण मुलांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने अंभोरे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Bjp Candidates : राज्यसभेसाठी भाजपकडून ‘या’ नावांची चर्चा; दिल्लीत होणार अंतिम निर्णय

Crop Insurance : शेतकऱ्यांना आता पिकाचादेखील काढता येणार इन्शुरन्स

Gondia News : आत्याच्या पिंडदानासाठी गेलेल्या युवकाचा दुर्दैवी मृत्यू

RBI MPC Meet : RBI चं पतधोरण जाहीर

Baba Siddique : काँग्रेसला मोठा धक्का ! बाबा सिद्दीकी यांचा काँग्रेसला रामराम

EVM Theft : निवडणूक आयोगाची मोठी कारवाई ! ईव्हीएम मशीन चोरी प्रकरणी 3 अधिकारी निलंबित

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!