Navi Mumbai News : नवी मुंबईमध्ये ‘संतोष माने’ घटनेची पुनरावृत्ती

490 0

नवी मुंबई : नवी मुंबईतील (Navi Mumbai News) उरणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना पाहून तुम्हाला पुण्यातील संतोष माने प्रकरणाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. यामध्ये 25 जानेवारी 2012 मध्ये पुण्यातील स्वारगेट पीएमटी स्थानकातून एक बस पळवून नेत संतोष मानेनं 9 जणांना चिरडलं होतं. तर 37 जण जखमी झाले होते. याच घटनेची पुनरावृत्ती आज नवी मुंबईमध्ये पाहायला मिळाली. यामध्ये भरधाव वेगात जाणाऱ्या नवी मुंबई महापालिकेच्या ईलेक्ट्री बसचं नियंत्रण सुटलं आणि या बसने तब्बल 6 ते 7 वाहनांना धडक दिली. या अपघातात एक जणाचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

काय घडले नेमके?
उरणमध्ये ही घटना घडली आहे. खोपटा कोप्रोली रस्त्यावर हा अपघात झाला आहे. नवी मुंबई महापालिकेची ईव्ही बस अचानक आऊटऑफ कंट्रोल झाली आणि हा अपघात झाला. खोपटा कोप्रोली रस्त्यावर दुचाकी वरून दोघेजण जात असताना बसने उडविले. यावेळी बसने आणखी 6 ते 7दुचाकी आणि टेम्पोलाही जोरदार धडक दिली. या अपघातात एकजण ठार एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

या अपघातग्रस्त ईव्ही बसचा वेग इतका होता की, बस कुठेच थांबली नाही. रस्त्याच्या बाजूला उतरून एका खड्यातून ती बाहेर गेली आणि बाजूला असलेल्या दुकानामध्ये शिरली. यावेळी वाटेत आलेल्या एका मिनी टेम्पोला धडक दिली. धडक बसल्यानंतर टेम्पो उलटला. याच टेम्पोनं एका दुचाकीला चिरडलं. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केलं आहे. या अपघातानंतर स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Chhatrapati Sambhaji Nagar Accident : दोन ट्रकमध्ये ओव्हरटेक करण्याच्या स्पर्धेमुळे 3 भावंडांना गमवावा लागला जीव

Bjp Candidates : राज्यसभेसाठी भाजपकडून ‘या’ नावांची चर्चा; दिल्लीत होणार अंतिम निर्णय

Crop Insurance : शेतकऱ्यांना आता पिकाचादेखील काढता येणार इन्शुरन्स

Gondia News : आत्याच्या पिंडदानासाठी गेलेल्या युवकाचा दुर्दैवी मृत्यू

RBI MPC Meet : RBI चं पतधोरण जाहीर

Baba Siddique : काँग्रेसला मोठा धक्का ! बाबा सिद्दीकी यांचा काँग्रेसला रामराम

EVM Theft : निवडणूक आयोगाची मोठी कारवाई ! ईव्हीएम मशीन चोरी प्रकरणी 3 अधिकारी निलंबित

Share This News

Related Post

अपघातानंतर खासगी ट्रॅव्हल्स बस पेटली, ७ जणांचा मृत्यू तर १३ जखमी, कलबुर्गी येथील घटना

Posted by - June 3, 2022 0
कलबुर्गी- खासगी ट्रॅव्हल्स बस आणि टेम्पो ट्रॅक्समध्ये झालेल्या धडकेनंतर बसने पेट घेतल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात बसमधून प्रवास करणाऱ्या सात जणांचा…

मोठी बातमी : मलकापुरात काँग्रेस नेत्याच्या रुग्णालय आणि घरात सव्वा दोन वर्ष वीज चोरी; 10 लाख 47 हजाराचा दंड वसूल

Posted by - March 27, 2023 0
मलकापूर : मलकापुरातून एक मोठी बातमी समोर येते आहे. काँग्रेस नेत्याच्या रुग्णालयात आणि घरात तब्बल सव्वा दोन वर्ष वीज चोरी…

‘पुष्पा’ सिनेमाची प्रेरणा घेऊन अडीच कोटींचे रक्तचंदन स्मगल करणारा गजाआड (व्हिडिओ)

Posted by - February 4, 2022 0
मिरज- दक्षिणेतील पुष्‍पा चित्रपटामुळे सध्या देशभर रक्तचंदनाच्या तस्करीचा विषय चर्चेत आहे. या सिनेमाची प्रेरणा घेऊन एका चोरट्याने तब्बल अडीच कोटींच्या…
Nashik News

Nashik News: नाशिकमधील अंबड रोडवर दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला; दोघांंचा मृत्यू

Posted by - August 11, 2023 0
नाशिक : सध्या राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. नाशिक (Nashik News) अशीच एक गुन्हेगारीची घटना उघडकीस आली आहे. या…
Gadar 2 Fight

Gadar 2 : ‘गदर 2’ चित्रपटादरम्यान ‘मोदी झिंदाबाद’, ‘पाकिस्तान झिंदाबाद’ ‘या’ घोषणा दिल्यामुळे दोन गटांमध्ये तुफान राडा

Posted by - August 15, 2023 0
सनी देओलचा बहुचर्चित ‘गदर 2: (Gadar 2) द कथा कंटिन्यूज’ बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करताना दिसत आहे. हा चित्रपट 11…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *