अहमदनगर : पुण्यातून एक भीषण अपघाताची (Accident News) घटना समोर आली आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये अडीच वर्षांच्या मुलीचादेखील समावेश आहे. अकोले शहरातील भेळ व्यवसायात प्रसिद्ध असलेले अभय सुरेश विसाळ (वय48),ओजस्वी हर्षल धारणकर (अडीच वर्षे), आशा सुनील धारणकर (वय 42), सुनिल दिनकर धारणकर (वय 65 ) (ता. अकोले, जि.अहमदनगर) असे अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
कसा घडला अपघात?
नाशिक – पुणे महामार्गावर संगमनेरच्या चंदनापुरी गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे.पुण्याहून संगमनेरकडे जाणाऱ्या मार्गिकेवरून जाणारा मालवाहू ट्रक सर्व्हीस लेनवरून जाणाऱ्या कारवर पलटी झाला. अपघातानंतर परिसरातील ग्रामस्थ व डोळासणे महामार्ग पोलिसांनी धाव घेत मदतकार्य केले. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला. हा अपघात नेमका कसा झाला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस आरोपी ट्रक चालकाचा शोध घेत आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Raj Thackeray : राज ठाकरेंना मोठा धक्का; ‘या’ शिलेदाराने साथ सोडत शिवसेनेत केला प्रवेश
Chandrakant Patil : भाजपाचे पद म्हणजे जबाबदारी आणि अपेक्षा! – नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन
Ranbir Kapoor : ‘ॲनिमल’च्या पुढच्या भागात ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत रोमान्स करणार रणबीर कपूर
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी केल्या ‘या’ 10 प्रमुख मागण्या
Viral Video : खोपोलीत बसमध्ये महिला वाहक आणि प्रवाशामध्ये फ्री स्टाईल हाणामारी
Sajjan Jindal: JSW समूहाचे एमडी सज्जन जिंदाल यांच्यावर बलात्काराचा आरोप
Nagpur News : नागपुरमधील सोलर कंपनीत भीषण स्फोट; 9 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू
Parbhani News : देवदर्शनाहून परतताना भीषण अपघात; 3 भाविकांचा मृत्यू
Accident News : भरधाव ट्रक दुकानांत घुसल्याने भीषण अपघात; 3 ठार