धकाधकीच्या जीवनात अनेकदा कंपन्यांकडून टारगेट पूर्ण करण्यासाठीच प्रेशर दिले जातात मात्र हे प्रेशर सहन न झाल्याने एका कर्मचाऱ्यांना आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
तरुण सक्सेना असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली आहे. यामध्ये आपल्या वरिष्ठांवर आरोप केले आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून वरिष्ठ टार्गेट पूर्ण करण्यासाठी दबाव टाकत असून, पगार कापला जाईल अशी धमकी देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बजाज फायनान्सने मात्र या आरोपांवर अद्याप भाष्य केलेलं नाही.