Pune Crime News

Pune Crime News : खळबळजनक ! तरुणी लहान भावाची तक्रार मोठ्या भावाकडे करायला गेली अन्…

844 0

पुणे : पुण्यातून (Pune Crime News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षणाचे माहेर घर असलेल्या पुण्यात मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. पुण्यातील अलंकार पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे.

काय घडले नेमके?
लहान भाऊ छेड काढत असल्याची तक्रार करण्यासाठी मोठ्या भावाकडे गेलेल्या एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने बलात्कार करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. किशोर परमेश्वर केदार आणि नकुल परमेश्वर केदार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या भावांची नावे आहेत. कोथरूड येथील गोसावी वस्ती जवळ हा संपूर्ण प्रकार घडला आहे.

फिर्यादी मुलगी अल्पवयीन आहे. ती क्लासला येत जात असताना आरोपी नकुल केदार याने तिची छेड काढली होती. याची तक्रार पिडितिने आरोपीचा मोठा भाऊ किशोर केदार यांच्याकडे केली होती. तक्रार करत असतानाच आरोपी किशोर केदार यांनी फिर्यादी तरुणीला जबरदस्तीने ओढून नेऊन माझ्या भावाची तक्रार करते काय असे म्हणून तिच्यावर बलात्कार केला. तसेच मी ज्यावेळेस बोलवेल त्यावेळेस यायचे नाही आलीस तर तुझे काय करायचे ते बघतो अशी धमकीदेखील आरोपीने पीडित तरुणीला दिली. आरोपीने दिलेल्या धमकीमुळं पीडित मुलगी खूपच घाबरली होती. तिच्या पालकांनी खोदून विचारल्यानंतर तिने घडलेली सगळी घटना सांगितली. यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाणे गाठून आरोपी भावाविरोधात तक्रार दाखल केली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Datta Dalvi Arrested : ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक

Maruti Navale : पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवलेंवर गुन्हा दाखल

Cylinder Blast : चेंबूरमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट; 4-5 घरे आगीच्या भक्षस्थानी

Datta Dalvi : दत्ता दळवी नेमके आहेत तरी कोण?

Pune News : भारत गौरव यात्रा रेल्वे मध्ये 40 प्रवाशांना अन्नातून विषबाधा

Uttarakhand Silkyara Tunnel : सध्या चर्चेत असलेले अरनॉल्ड डिक्स कोण आहेत?

Team India Head Coach : BCCI ने टीम इंडियाच्या हेड कोचचे नाव केले जाहीर; ‘या’ दिग्गज खेळाडूकडे सोपवली टीमची कमान

Share This News
error: Content is protected !!