पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील असा दावा आमदार रोहित पवारांनी केल्यानंतर बारामतीतून अजित पवारांचे पुत्र जय अजित पवार निवडणूक लढतील अशा चर्चा सुरू झाल्या.
अशातच आता पुण्यात माध्यमांशी बोलत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जय पवार यांच्या उमेदवारीबद्दल पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेईल मी सात ते आठ वेळा निवडून आलो आहे त्यामुळे मला आता इच्छा नाही असं म्हणत अप्रत्यक्षरित्या जय पवार यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलं असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुकी वेळी आपण दिलेल्या उमेदवाराचा जर पराभव झाला तर विधानसभा निवडणूक लढणार नाही अशी घोषणाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीच्या काटेवाडीत झालेल्या जाहीर सभेमध्ये केली होती त्या अनुषंगाने जय पवार यांच्या उमेदवारीच्या चर्चांना उधान आलं होतं