महाराष्ट्रात दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून अशीच एक घटना महाराष्ट्रामध्ये घडली आहे.
बदलापूरमधील शाळेतील मुलींवर झालेला अत्याचार असो की राज्यभरातील वेगवेगळ्या शहरातील घटना , मुली-महिला अत्याराला बळी पडतानाच दिसत आहेत.
महाराष्ट्रात पुन्हा एकदा अशीच एक धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली असून तेरा वर्षीय शाळकरी मुलीवर एका रिक्षाचालक नराधमानं अनन्विक अत्याचार केलेत. संबंधित रिक्षाचलकावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुझ्या आईला मारून टाकीन…
या प्रकरणात मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तेरा वर्षीय मुलगी शाळेत जात असताना या नराधमाची त्या मुलीवर नजर पडली आणि या नराधमानं पडक्या इमारतीत नेऊन तिच्यावर अत्याचार केले. तसेच या घटनेबद्दल तुझ्या आईला व इतर कोणालाही काही सांगू नको अन्यथा तुझ्या आईलाच मारून टाकीन अशी धमकी दिली.
दरम्यान महाराष्ट्रात वाढणाऱ्या वाढत्या महिला अत्याचाराच्या घटना कमी करण्यासाठी राज्याच्या गृह विभागाकडून कठोर पावलं उचलण्याची गरज निर्माण झाली असून राज्याचा गृह विभाग केव्हा कठोर होणार हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे.