नवी दिल्ली: राजधानी नवी दिल्लीतून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.
दोनच दिवसांपूर्वी दिल्लीतील कथित मध्य घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर झाला होता. त्यानंतर आज आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांस समवेत बोलत असताना अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केली आहे.
कार्यकर्त्यांसमवेत बोलत असताना अरविंद केजरीवाल म्हणाले जोपर्यंत जनता आपला निर्णय सांगणार नाही तोपर्यंत मी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसणार नाही. दरम्यान अरविंद केजरीवाल यांच्या या घोषणेमुळे दिल्लीच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.