पुणे: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार तयारी पाहायला मिळत असून याच अनुषंगाने आता पुण्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघांचा महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वडगाव शेरी व खडकवासला या मतदारसंघात भाजपा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये अदलाबदल होण्याची शक्यता आहे वडगाव शेरीची जागा भाजपाला तर खडकवासल्याची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळण्याची दाट शक्यता आहे.
या फॉर्मुलानुसार भाजपा पाच अजित पवारांची राष्ट्रवादी दोन तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला एक जागा मिळण्याची शक्यता आहे.
हडपसर विधानसभेची जागा शिंदे याच्या शिवसेनेला सुटण्याची शक्यता असून शिंदेंच्या शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष माजी नगरसेवक प्रमोद उर्फ नाना भानगिरे इच्छुक आहेत