ऐन सणासुदीच्या काळात गृहिणींचा बजेट कोलमडणारी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आले असून खाद्यतेलाच्या किमतींमध्ये वाढ होणार आहे.
अर्थ मंत्रालयाकडून एक अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यानुसार, क्रुड आणि रिफाइंड पाम तेल, सोयाबीन तेल आणि सनफ्लॉवर सीड तेल यांवर बेसिक कस्टम ड्युटी वाढवण्यात आली आहे. क्रुड पाम ऑइल, क्रूड सोयाबीन तेल आणि क्रुड सनफ्लॉवर सीड ऑइलवर बेसिक कस्टम ड्युटीचे दर आत्तापर्यंत शून्य होती.
म्हणजेच या तेलांवरील आयात शुल्क लागत नव्हते. आता हेच आयात शुल्क वाढून २० टक्के करण्यात आलं आहे.