मुंबई : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी (Pradip Shrama) आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आला आहे. मुंबईतील अंधेरीतील त्यांच्या निवासस्थानी आयकर विभागाने छापेमारी केली आहे. माजी खासदार आणि आमदाराच्या कर चुकवे प्रकरणी प्रदीप शर्मा यांच्या घरावर आयकर विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
कोण आहे प्रदीप शर्मा ?
प्रदीप शर्मा हे 1983 मध्ये पोलीस दलात दाखल झाले होते. त्यांची कारकीर्द अतिशय वादात राहिली. रामनारायण गुप्ता उर्फ लखनभय्या याचा बनावट एन्काऊंटर आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध अशा आरोप प्रकरणात 2008 मध्ये प्रदीप शर्मा यांना पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आले होते.
त्यानंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यासह प्रदीप शर्मा हे अँटेलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आरोपी आहेत. याच प्रकरणात काही काळ त्यांनी तुरुंगवाससुद्धा भोगला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट 2023 मध्ये त्यांना जामीन मंजूर केला होता.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Navi Mumbai News : नवी मुंबईमध्ये ‘संतोष माने’ घटनेची पुनरावृत्ती
Bjp Candidates : राज्यसभेसाठी भाजपकडून ‘या’ नावांची चर्चा; दिल्लीत होणार अंतिम निर्णय
Crop Insurance : शेतकऱ्यांना आता पिकाचादेखील काढता येणार इन्शुरन्स
Gondia News : आत्याच्या पिंडदानासाठी गेलेल्या युवकाचा दुर्दैवी मृत्यू
RBI MPC Meet : RBI चं पतधोरण जाहीर
Baba Siddique : काँग्रेसला मोठा धक्का ! बाबा सिद्दीकी यांचा काँग्रेसला रामराम
EVM Theft : निवडणूक आयोगाची मोठी कारवाई ! ईव्हीएम मशीन चोरी प्रकरणी 3 अधिकारी निलंबित