कुख्यात गुंड गजानन मारणेच्या मुलाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा, अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी

887 0

पुणे- पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे याचा मुलगा प्रथमेश मारणे याच्या याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात एका तरुणीने या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोपही या तरुणीने केला आहे.

प्रथमेश मारणे याने जवळपास २ वर्ष विविध ठिकाणी नेऊन माझ्या मनाविरुद्ध माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. तसेच हे सर्व करताना चोरून अश्लील व्हिडिओ शूट केले. हे व्हिडिओ डिलीट करण्याबाबत विचारल्यावर त्याने टाळाटाळ केली. पोलिसांत फिर्याद देण्याचे सांगितल्यावर त्याने या तरुणीला धमक्या दिल्या. ‘काय करायचे ते कर, मी कुणाला घाबरत नाही’ असे म्हणत अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही दिली.

याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे भा. दं. वि. कलम 376, 504, 506 माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 प्रमाणे कलम 66 (E) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

काही दिवसांपूर्वी प्रथमेश मारणे याने आपली आई जयश्री मारणे यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  अधिकृत प्रवेश केला होता.

 

Share This News

Related Post

अखेर ठरलंच! पुणे महागरपलिकेची अंतिम प्रभाग रचना ‘या’ दिवशी होणार जाहीर

Posted by - May 10, 2022 0
सर्वोच्च न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला दोन आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याच्या सूचना दिल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगानं कंबर कसली असून…
Nilesh Lanke

Nilesh Lanke : मधु दंडवते आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्कार आमदार निलेश लंके यांना प्रदान

Posted by - January 8, 2024 0
पारनेर : स्वातंत्र सेनानी,जिल्ह्याचे सुपुत्र तसेच माजी केंद्रीय रेल्वे व अर्थ मंत्री मधु दंडवते यांच्या नावाने मला आदर्श लोकप्रतिधी या…
Afghanistan Earthquake

Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानात विनाशकारी भूकंप! 2,000 जणांचा मृत्यू

Posted by - October 8, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अफगाणिस्तान पुन्हा एकदा भूकंपाच्या (Afghanistan Earthquake) धक्क्याने हादरले आहे. तालिबानी प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानच्या पश्चिमी…
Gautami And Father

आडनावावरुन सुरु असणाऱ्या वादावर गौतमी पाटीलच्या वडिलांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Posted by - June 2, 2023 0
मुंबई : गौतमी पाटील (Gautami Patil) ही गेल्या अनेक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तिच्या समोरील अडचणी काही थांबायच्या नाव…

पहिल्या पतीला सोडलं, केलं दुसरं लग्न; तिसऱ्यानेच पाठवले पत्नीला तसले व्हिडिओ, मोबाईल पाहून पतीची पायाखालची जमीनच सरकली…

Posted by - March 8, 2023 0
उत्तराखंड : हल्द्वानी मधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या महिलेने पहिलं लग्न केलं होतं. पण हे पहिलं लग्न…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *