ब्रेकिंग न्यूज, हैद्राबादमध्ये गोदामाला भीषण आग, 11 जण जिवंत जळाले

359 0

तेलंगणा- हैदराबादच्या बोयागुडा भागात एका भंगाराच्या गोदामाला लागलेल्या आगीत 11 जण जिवंत जाळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत्युमुखी पडलेले सर्वजण बिहारचे असून येथील रद्दीच्या गोदामात काम करायचे. आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे सांगण्यात येत असून सुमारे 12 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. घटनेच्या वेळी मजूर गोदामात झोपले होते. आतापर्यंत 11 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. भीषण आग लागल्यामुळे एक भिंत कोसळली, त्यामुळे येथे अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात अडथळे येत होते. सध्या एक जणाला बचावण्यात आले असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, गांधी नगरचे एसएचओ मोहन राव यांनी सांगितले की, गोदामात 12 लोक उपस्थित होते. यापैकी 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 1 जण जिवंत बचावला आहे. बचावकार्य वेगात सुरु आहे. आगीचे कारण शॉर्टसर्किट असल्याचे सांगितले जात असले तरी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सध्या आग पूर्णपणे विझवण्यात आली आहे.

हैदराबादचे डीसीपी सेंट्रल झोन यांनी सांगितले की, आग आटोक्यात आणण्यात आली आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन करून पुढील कारवाई केली जाईल. मृत्युमुखी पडलेले सर्व बिहारचे रहिवासी आहेत.

Share This News
error: Content is protected !!