लाडकी बहिणी योजना; लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर सायबर गुन्हेगारांचा डोळा; पाहा नेमकी कशी घ्याल काळजी?
राज्य सरकारची महत्त्वकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यात मोठा प्रतिसाद मिळत असून, या योजनेतील पात्र महिलांच्या बँक खात्यात पैसेही यायला सुरुवात झाली. परंतु आता लाडकी बहीण योजनेच्या बँक खात्यांवर सायबर गुन्हेगारांचा डोळा असण्याची शक्यता वर्तवण्याची येत आहे .
राज्य सरकारची महत्वकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला महाराष्ट्रातून मोठा प्रतिसाद मिळत असून, राज्यभरातून सुमारे सव्वा कोटी अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी जवळपास एक कोटी महिलांच्या खात्यावर पैसे ही जमा झाल्याचं पाहायला मिळतेय. नुकतंच पुण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत एक कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेच्या लाभाचा शुभारंभ करण्यात आलाय. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांना शासनाकडून होत असलेल्या आर्थिक मदतीवर आता सायबर गुन्हेगारांचा डोळा असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांच्या बँक खात्यात लाभाचे पैसे येण्यास सुरुवात झाली असून, आता महिलांच्या बँक खात्यावर सायबर गुन्हेगारांचा डोळा असल्याचं दिसून येतंय. त्यासाठी सायबर विभागाकडून महिलांना सतर्क करण्यात आलेला आहे.
महिलांनी काय काळजी घ्यावी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात येण्यास सुरुवात
लाडकी बहीण योजनेचा अर्ज केला असेल तर तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकतं
सायबर गुन्हेगारांचा लाडकी बहीण योजनेच्या खात्यांवर डोळा
सायबर चोरटे पाहत आहेत तुमची चूक होण्याची वाट
‘डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन’च्या नावाखाली होऊ शकते तुमची फसवणूक
लाडकी बहीण योजनेच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा योजनेचा पहिला हप्ता जमा करण्याच्या नावाखाली तुम्हाला एक कॉल येईल किंवा तुम्हाला ओटीपी मागितला जाईल किंवा तुम्हाला एखादी लिंक पाठवली जाईल आणि त्यावर क्लिक करायला सांगितलं जाईल किंवा तुम्हाला एखादं अप्लिकेशन इन्स्टॉल करायला सांगितलं जाईल.
तुम्ही त्यांना ओटीपी सांगितला, एखादी लिंक पाठवली त्यावर क्लिक केलं, किंवा अप्लिकेशन इन्स्टॉल केलं, तर तुमचा मोबाईल हॅक होऊन, तुमचं खातं रिकामं होऊ शकतं.
जर तुमची फसवणूक झाली असेल तर तुम्ही सायबर क्राईमच्या हेल्पलाइन नंबर 1930 ला तक्रार नोंदवू शकता.
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे यायला सुरुवात झाली असून, महिलांच्या बँक खात्यावर सायबर गुन्हेगारांचा डोळा आहे त्यामुळे त्यामुळे महिलांनी सायबर गुन्हेगारांपासून सतर्क राहणं गरजेचं आहे.
लाडकी बहिणी योजना; लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर सायबर गुन्हेगारांचा डोळा; पाहा नेमकी कशी घ्याल काळजी?