पुणे: जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांच्या महंमदवाडी शिक्रापूर बुरुंजवाडी येथील निवासस्थानांवर ‘ईडी’ने छापेमारी केली आहे. मागील सहा तासांपासून ही कारवाई सुरू आहे.
चार वर्षांत ईडीची ही दुसरी कारवाई बांदल यांच्यावर होत आहे.लोकसभा निवडणुकीत मंगलदास बांदल यांना वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, बांदल यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी बांदल यांची उमेदवारी रद्द केली होती.