नवी मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपले असून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून मोठे रस्सीखेच पाहायला मिळत आहे.
महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षान मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करून निवडणुकीला सामोरे जावं अशी मागणी केल्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोधी पक्ष कधीही मुख्यमंत्री पदाचा चेहरा देऊन निवडणुकीला सामोरा जात नाही ज्या पक्षाच्या जास्त जागा येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल असं म्हटलं आहे.
या पार्श्वभूमीवर TOP NEWS मराठीच्या माध्यमातून नागरिकांमधून एक सर्व्हे करण्यात आला या सर्व्हेमध्ये तब्बल 18000 लोकांनी सहभाग नोंदवला होता
या सर्व्हेमध्ये मतदारांनी 77% इतकी सर्वाधिक पसंती उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्याला दिली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना 12 टक्के लोकांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पसंती दिली आहे. त्यानंतर काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना सात टक्के तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना तीन टक्के मतदारांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पसंती दर्शवली आहे.