मुंबईत दहीहंडीच्या उत्सवाला गालबोट; आतापर्यंत 41 गोविंदा जखमी
राज्यभरात दहीहंडीचा उत्सव आज मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. सकाळपासूनच राज्यातील विविध मंडळांच्या दहीहंड्या फोडायला गोविंदा पथकं झाली आहेत. मात्र यंदाही सणाला गालबोट लागलेले दिसून येत आहे. कारण सकाळपासून मुंबईमध्ये सुरू असलेल्या दहीहंडी उत्सवात आत्तापर्यंत 41 गोविंदा जखमी झाले असून 8 जणांना रुग्णालयात भरती करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
दहीहंडी फोडण्यासाठी कमी वेळात जास्तीत जास्त थर लावण्याचा प्रयत्न गोविंदा पथकांकडून करण्यात येत आहे. हे थोर लावत असतानाच तोल जाऊन पडल्यामुळे गोविंदांचे अपघात होत आहेत. यामुळेच मुंबईत आतापर्यंत 41 गोविंदांचे अपघात झाले आहेत. या गोविंदाच्या बचाव कार्यासाठी वैद्यकीय टीम मोठ मोठ्या मंडळांनी तैनात केल्या आहेत. तर ज्या भागांमधील गोविंदा जखमी होत आहेत त्यांना जवळच्याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत मुंबईतील केईएम रुग्णालयात 1, नायर रुग्णालयात 4, सायन रुग्णालयात 2, सेंट जॉर्ज हॉस्पिटलध्ये 1, पोद्दारमध्ये 4, कुर्ला भाभा रुग्णालयात 1, एमटी अगरवार रुग्णालयात 1 आणि राजावाडीमध्ये एका रुग्णावर उपचार सुरु आहेत.