मालवण: 4 डिसेंबर 2023 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मालवणमधील राजकोट किल्यावर साकारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं.
मात्र केवळ आठ महिन्यातच म्हणजे 26 ऑगस्ट 2024 रोजी हा पुतळा कोसळला आणि शिवप्रेमींसह प्रत्येक महाराष्ट्र वासियांच्या मनात एक संतापाची लाट उसळली असतानाच हा पुतळा साकारणारा शिल्पकार जयदीप आपटे फरार झाला होता. त्यांच्या तपासासाठी पोलिसांनी तीन पथके तयार केली होती.
https://x.com/PTI_News/status/1831386384847843351?s=19
मात्र आज अखेर जयदीप आपटे याला कल्याण पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.अंधाराचा फायदा घेत पोलिसांची नजर चुकवत आपल्या पत्नी आणि आईला भेटण्यासाठी त्याच्या कल्याणच्या राहत्या घरी आला होता. पण पोलिसांनी जयदीप आपटे याला ताब्यात घेतले आहे.