अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ! सीबीआयकडून गुन्हा दाखल

157 0

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय…

तत्कालीन पोलीस अधीक्षक यांना धमकावल्याचा आरोप अनिल देशमुख यांच्यावर ठेवण्यात आला आहे. आणि याचमुळे अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय.

नेमकं काय आहे प्रकरण? 

राज्यात महाविकास आघाडीचा सरकार असताना भाजप नेते आणि राज्याचे विद्यमान ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना अटक करण्यासाठी अनिल देशमुख यांनी जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंडे यांना धमकावल्याचा अनिल देशमुख यांच्यावर आरोप आहे. आणि याचमुळे सीबीआयकडून अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीबीआयकडून गुन्हा दाखल होताच अनिल देशमुख यांनी मानले देवेंद्र फडणवीस यांचे आभार

सीबीआयकडून गुन्हा दाखल होताच अनिल देशमुख यांनी एक्स वर पोस्ट करत राज्याचे विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत

अनिल देशमुख आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हणतात धन्यवाद… देवेंद्रजी फडणवीस. माझ्यावर CBI कडून आणखी एक तथ्यहीन गुन्हा दाखल केला गेला आहे. जनतेचा कौल बघून फडणवीसांच्या पायाखालची वाळू घसरल्याने हे कटकारस्थान सुरू झाले आहे. या अशा धमक्यांना आणि दबावाला मी अजिबात भीक घालत नाही. न झुकता – न डगमगता मी भाजपच्या या दडपशाही विरुद्ध लढण्याची खूनगाठ बांधली आहे असे देशमुख म्हणाले.

तसेच महाराष्ट्रात फडणवीसांकडून किती खालच्या पातळीचे आणि विकृत मानसिकतेचे घाणेरडे राजकारण सुरू आहे ते जनतेने बघावे. लोकसभा निवडणुकीत या कारस्थानी नेतृत्वाला जनतेने जागा दाखवून दिली आहे, आता महाराष्ट्राची जनता विधानसभा निवडणुकीची वाट बघत आहे.

दरम्यान अनिल देशमुख यांवर सीबीआयकडून गुन्हा दाखल झाल्याने महाविकास आघाडी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

 

Share This News

Related Post

राज ठाकरे जिंदाबाद होते आणि जिंदाबाद राहतील – वसंत मोरे

Posted by - April 9, 2022 0
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवर भोंग्यांसदर्भात वक्तव्य केलं.त्या नंतर आपण आपल्या प्रभागात भोंगे लावणार नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर…
chandrayan 3

चांद्रयान-3 तयारी झाली ! काय आहेत वैशिष्ट्ये?

Posted by - May 23, 2023 0
मुंबई : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् इस्रो (ISRO) भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्र मोहिमेसाठी सज्ज झाली आहे. चांद्रयान-3 (Chandrayaan-3) च्या प्रक्षेपणाची…
BJP

भाजपचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला ? कोअर कमिटीच्या बैठकीत नेमकं काय ठरलं पाहा

Posted by - August 12, 2024 0
राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. विधानसभा निवडणुका अवख्या दोन महिन्यांवर येऊन ठेपल्यात. त्या दृष्टिकोनातून सर्वच पक्षांनी आपापली…
Maratha Reservation

Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Posted by - July 19, 2023 0
मुंबई : सध्या राज्यात पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाकडून (Maratha Reservation) ओबीसी कोट्यातून 50 टक्क्यांच्या मर्यादेत…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीनं कारवाई केलेलं प्रकरण नेमकं आहे तरी काय ?

Posted by - March 23, 2022 0
रश्मी ठाकरेंचे भाऊ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या कारवाईत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *