पुणेकरांनी अनुभवला पुनीत बालन ग्रुपच्या संयुक्त दहिहंडीचा थरार; शिवतेज दहिहंडी संघाने सात थर रचत फोडली हंडी

74 0

गोविंदा रे गोपाळाचा जयघोष, ढोल ताशांचा मंगलमय गजर, आकर्षक विद्युत रोषणाई, डीजेने वाजविलेले आकर्षक संगीत आणि त्यावर थिरकनाऱ्या तरुणाईचा उसळलेला जनसागर अशा उत्साही वातावरणात पुनीत बालन ग्रुप आयोजित 35 सार्वजनिक मंडळांची संयुक्त दहीहंडीचा थरार पुणेकरांनी अनुभवला. ऐतिहासिक लाल महाल चौकात तुडुंब गर्दीसमोर शिवतेज दहीहंडी संघाने सात थर रचत ही संयुक्त दहीहंडी फोडण्याचा बहुमान मिळवला.

शहरातील चौक चौकात होणार्‍या दहिहंडी कार्यक्रमांमुळे होणारी वाहतुक कोंडी टाळण्यासाठी आणि सुरक्षा व्यवस्थेमुळे पोलिस यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी युवा उद्योजक पुनीत बालन यांनी पुढाकार घेऊन संयुक्त दहिहंडी कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतला होता. ३५ सार्वजनिक गणेश मंडळांनी या उपक्रमाला पाठिंबा देत या संयुक्त दहीहंडीत सहभाग घेतला.

छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर ऐतिहासिक लाल महाल चौकात या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. चौरंगी पॅंडलमध्ये आकर्षक विद्युत रोषणाईने ही दहिहंडी पुणेकरांचे लक्ष वेधून घेत होती.

सायंकाळी चारच्या सुमारास कार्यक्रमाला सुरवात झाली. सुरवातीला समर्थ, नादब्रम्ह, शिवमुद्रा, युवा वाद्य पथक या ढोल पथकांनी केलेल्या ढोल-ताशा वादनाने संपुर्ण परिसरात उत्साह भरला. डीजेच्या वादनाला सुरवात झाल्यांनतर उत्साहाला आणखीच उधाण आले. त्यात अधून मधून पावसाच्या सरींची हजेरी आणि देहभान विसरून हजारोंच्या तरुणाईमुळे यामुळे वातावरण जोशपूर्ण झाले होते. महिला आणि तरुणांची संख्याही मोठी होती. या अशा उत्साह पूर्ण वातावरणात वीस गोविंदा पथकांनी सलामी देऊन उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

त्यात मुंबईतील चेंबूर येथील तरुणी आणि महिलांच्या पथकाने दिलेली सलामी लक्षवेधक ठरली.

रात्री साडेनऊच्या सुमारास कसबा पेठेतील शिवतेज दहीहंडी संघाने सात थर लावत ही पहिली संयुक्त हंडी फोडली. आयोजक पुनीत बालन व अभिनेते प्रवीण तरडे यांच्या हस्ते या संघाला चषक देऊन सन्मानित करण्यात आले.

आयोजक पुनीत बालन, माणिकचंद ऑक्सिरीचच्या अध्यक्षा जान्हवी धारीवाल- बालन यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी अभिनेता प्रविण तरडे, महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख

यांच्यासह राजकीय, सामाजिक यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या संयुक्त दहीहंडीला हजेरी लावली.

Share This News

Related Post

पुणेकरांसाठी महत्वाची सूचना ! चांदणी चौकाला जोडणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

Posted by - October 3, 2022 0
पुणे : प्रचंड गाजावाजा झालेला चांदणी चौकातला पूल अखेर पाडण्यात आला. सहाशे किलो स्फोटकं वापरून रविवारी मध्यरात्री नियंत्रित स्फोटाद्वारे मध्यरात्री…
Devendra Fadanvis

Devendra Fadnavis : फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये पुणे हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणी पोलिसांना दिल्या ‘या’ सूचना

Posted by - May 21, 2024 0
पुणे : पुण्यातील पोर्शे अपघातावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

PMC Recruitment 2024 : पुणे महानगरपालिकेत ‘या’ पदांसाठी होतेय भरती; कसा कराल अर्ज ?

Posted by - February 11, 2024 0
पुणे : पुणे महानगरपालिकेच्या (PMC Recruitment 2024) भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय पुणे येथे विविध पदांसाठी भरती…

निवडणुका नाही उगाच कशाला भिजत भाषण करायचं; राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला

Posted by - May 22, 2022 0
पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात राज ठाकरे यांची सभा सुरू आहे.पावसात भिजून भाषण करावं म्हटलं पण निवडणुका नाही, काही…
ED

सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष ॲड. अमर मुलचंदानी यांच्यासह 4 जणांना ईडीनं घेतलं ताब्यात

Posted by - January 29, 2023 0
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष ॲड. अमर मुलचंदानी यांच्यासह काही संचालकांवर ईडीने कही दिवसांपूर्वी छापे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *