‘दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा’; 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार राजधानी नवी दिल्लीत

923 0

मुंबई: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार असा प्रश्न सर्वच साहित्य प्रेमींना पडला होता या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं असून यंदाचा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानी नवी दिल्लीत होणार आहे. 

सरहद या संस्थेकडून या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आलं असून राजधानी नवी दिल्लीत तब्बल सात दशकांनी माय मराठीचा जागर होणार आहे.

फेब्रुवारी महिन्यात साने गुरुजी नगरी अमळनेर या ठिकाणी 97 व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं होतं त्यामुळे धुळ्याचा पर्याय हा बाद झाला होता. त्याचबरोबर औंध आणि अमळनेर या दोन ठिकाणांचा पर्यायही अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडे होता मात्र ही दोन्ही ठिकाणे लहान असल्यानं या ठिकाणांना नापसंत देण्यात आली.

त्यानंतर नवी दिल्ली, मुंबई, इचलकरंजी या तीन पर्याय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडे होते. त्यानंतर आता नवी दिल्लीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं असून जानेवारी अथवा फेब्रुवारी महिन्यात तालकटोरा स्टेडियम किंवा दिल्लीतील मध्यवर्ती ठिकाणावरील भागात हे साहित्य संमेलन पार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

Share This News

Related Post

17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषद आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर,’या’ दिवशी होणार मतदान

Posted by - July 8, 2022 0
राज्यातील 92 नगरपरिषद आणि 4 नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. 18 ऑगस्टला मतदान होणार असून,या निवडणुकीची प्रक्रिया 20…

स्वातंत्र्यवीर सावरकर आमचं दैवत, आपमान सहन करणार नाही

Posted by - March 26, 2023 0
मालेगाव: स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचं दैवत असून आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान कदापि सहन करणार नाही अशा शब्दात शिवसेना उद्धव बाळासाहेब…

पहिले तिला संपवले; मग स्वतःला दिली अशी शिक्षा; प्रेयसीने दुसरीकडे लग्न केले म्हणून असा केला घात !

Posted by - February 27, 2023 0
सातारा : सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. माण तालुक्यातील वांजोळी या गावात राहणाऱ्या एका जोडप्याने…

भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण

Posted by - May 14, 2022 0
पुणे- भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर यांच्या कार्यालयात घुसून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या…

वसंत मोरे मनसेच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमधून लेफ्ट

Posted by - April 7, 2022 0
पुणे- मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा आम्ही मशिदींसमोर हनुमान चालिसा लावू असा इशारा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात दिला होता.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *