अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील प्रशासनाला सतर्क राहण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

219 0

मुंबई, दि. 4 : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुणे आणि जिल्हा परिसरात आज जोराचा पाऊस होत असून या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रशासनाने सज्ज राहावे. नदी आणि धरण परिसरातील संभाव्य धोकादायक क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे. आवश्यकता वाटल्यास एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि सेनादलाची मदत घेण्यात यावी. लोकांचे स्थलांतर केल्यास त्यांच्यासाठी निवारा, कपडे, जेवण इत्यादी सर्व व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे महापालिका आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकारी यांना दूरध्वनीद्वारे दिल्या आहेत.

पुणे परिसरातील खडकवासला, मुळशी, पवना इत्यादी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर या धरण आणि नदी परिसरातील पूररेषेच्या आतील आणि संभाव्य धोका क्षेत्रातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात यावे. या विसर्गामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील बाधित होऊ शकणाऱ्या एकतानगर, दत्तवाडी, पाटील इस्टेट, येरवडा परिसर, शिवाजी नगर कोर्ट परिसर, कामगार पुतळा, हॅरीस ब्रीज, दापोडी, जुनी सांगवी, कासारवाडी, पिंपरी कॅम्प , रावेत, बालेवाडी गावठाण, ज्युपीटर हॉस्पिटल परिसर, कपिल मल्हार परिसर, बाणेर, बावधन, संगमवाडी इत्यादी सखल भागातील लोकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.

संपूर्ण प्रशासनाने या काळात अलर्ट राहावे. लोकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करणे, निवारा केंद्रांमध्ये त्यांच्यासाठी सर्व सुविधांची उपलब्धता करून देणे यासाठी सर्व प्रशासनाने समन्वयाने काम करावे. हवामान खात्याकडून येणाऱ्या विविध सूचनांची दखल घेऊन त्याची लोकांना त्वरित माहिती देण्यात यावी. सर्वांनी सतर्क राहून लोकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिल्या आहेत.

Share This News

Related Post

Saswad Crime

धक्कादायक ! सासवडमध्ये रस्ता स्वच्छ करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला कारने चिरडले

Posted by - June 5, 2023 0
पुणे : पुण्यातील सासवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये रस्त्याच्या कडेला स्वच्छतेचे काम करणाऱ्या महिलेला एका व्यवसायिक कार चालकाने…

मोठी बातमी ! एनसीबीच्या कारवाईत कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त, दोघांना अटक

Posted by - May 27, 2022 0
मुंबई- मुंबईत दोन ठिकाणी छापे टाकून मुंबईच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज…

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अॅनिमेटेड डूडलद्वारे गूगलने दिल्या अनोख्या शुभेच्छा

Posted by - March 8, 2022 0
आज जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जात आहे. अशा परिस्थितीत गुगलने खास डूडल बनवून जगभरातील महिलांबद्दल प्रेम आणि आदर…

निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी; पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं विसर्जन

Posted by - September 17, 2024 0
पुणे: आज अनंत चतुर्दशी अर्थात गणरायाची विसर्जन मिरवणूक 7 सप्टेंबर पासून सुरू झालेला गणेशोत्सवाचे आज सांगता झाली. पुण्यामध्ये तब्बल 12…

पुणे शहर व जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला परिस्थितीचा आढावा

Posted by - July 25, 2024 0
  पुणे शहर व जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर* *उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला परिस्थितीचा आढावा *बचाव आणि मदतकार्यासाठी सतर्क राहण्याचे* *जिल्हा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *