‘दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा’; 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार राजधानी नवी दिल्लीत

1077 0

मुंबई: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार असा प्रश्न सर्वच साहित्य प्रेमींना पडला होता या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं असून यंदाचा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानी नवी दिल्लीत होणार आहे. 

सरहद या संस्थेकडून या साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आलं असून राजधानी नवी दिल्लीत तब्बल सात दशकांनी माय मराठीचा जागर होणार आहे.

फेब्रुवारी महिन्यात साने गुरुजी नगरी अमळनेर या ठिकाणी 97 व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं होतं त्यामुळे धुळ्याचा पर्याय हा बाद झाला होता. त्याचबरोबर औंध आणि अमळनेर या दोन ठिकाणांचा पर्यायही अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडे होता मात्र ही दोन्ही ठिकाणे लहान असल्यानं या ठिकाणांना नापसंत देण्यात आली.

त्यानंतर नवी दिल्ली, मुंबई, इचलकरंजी या तीन पर्याय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडे होते. त्यानंतर आता नवी दिल्लीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं असून जानेवारी अथवा फेब्रुवारी महिन्यात तालकटोरा स्टेडियम किंवा दिल्लीतील मध्यवर्ती ठिकाणावरील भागात हे साहित्य संमेलन पार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

Share This News
error: Content is protected !!