आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या आघाडीची चाचपणी सुरू असून याच पार्श्वभूमीवर युवराज छत्रपती संभाजीराजे माजी राज्यमंत्री बच्चू कडू स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीची स्वराज्य प्रमुख युवराज छत्रपती संभाजीराजे, प्रहार चे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चू कडू स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष राजरत्न आंबेडकर, भारतीय जवान किसान पार्टीचे अध्यक्ष नारायण अंकुशे एकत्रितपणे पाहणी करणार आहेत.
सोमवारी सकाळी नांदेड व परभणी जिल्ह्यात होणाऱ्या या दौऱ्यानं राज्यात तिसऱ्या आघाडीची चर्चेने पुन्हा जोर धरला आहे