अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या बिग बॉसच्या सीजन 5 मध्ये पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार असून वाईल्ड कार्ड करणारा हा कलाकार नेमका आहे याचीच चर्चा सध्या नेटकऱ्यांमध्ये सुरू झाली आहे.
आज हा कलाकार नेमका कोण आहे हे घरातील स्पर्धकांना कळणार असून या कलाकाराविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. नुकताच घनश्याम दरोडे याने घराचा निरोप घेतला. आता त्याजागी दुसऱ्या व्यक्तीची घरात एंट्री झाली आहे.
नेटकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा व्यक्ती संग्राम चौगुले आहे. संग्राम चौगुले हा कोल्हापूरचा लोकप्रिय बॉडीबिल्डर आहे. त्याने २०१२ साली साली मिस्टर युनिव्हर्स हा किताब जिंकला होता. तर २०१४ साली तो मिस्टर वर्ल्ड बनला. त्याने अनेक पुरस्कार आपल्या नावे केले आहेत. तो सध्या पुण्यात स्थायिक आहे.