मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघात म्हणजेच परळीमध्ये घोंगडी बैठक होणार आहे. या घोंगडी बैठकीची जोरदार तयारी परळी मध्ये सुरू असतानाच राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी थेट अंतरवाली सराटी गाठत मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली.
लोकसभा निवडणुकीनंतर मराठा आरक्षणाचे आंदोलन उभारणारे मनोज जरांगे आणि राज्याच्या राजकारणात सक्रिय असणाऱ्या राजकीय नेत्यांमध्ये रात्रीच्या बैठकांमध्ये वाढ झाली आहे .
अंतरवाली सराटी मध्ये पांडुरंग तारक यांच्या निवासस्थानी कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे यांची भेट झाली आहे. ही भेट नेमकी कशासाठी झाली किंवा या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे