सोलापूर: राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांच्या पुतण्याच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील भूम परंडा तालुक्यातील सोनारी या ठिकाणी असणाऱ्या तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या घराबाहेर गोळीबार झाला आहे.
रात्री बारा वाजून 37 मिनिटांनी हा गोळीबार झाला असून दोन अज्ञात व्यक्तींनी हा गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे.
नेमका का गोळीबार करण्यात आला या गोळीबारामध्ये कोणती जीवितहानी झाली आहे का याची माहिती मात्र अद्याप मिळू शकली नाही.