चंदीगड: हरियाणा विधानसभेचा बिगुल वाजला असून हरियाणा मध्ये सर्व पक्ष मोर्चे बांधणी करताना पाहायला मिळत आहेत.
हरियाणा मध्ये विधानसभेसाठी भाजपा, काँग्रेस जननायक जनता पक्ष, आझाद समाज पक्ष (कांशीराम) या पक्षांमध्ये लढत पाहायला मिळत आहे.
5 ऑक्टोबर रोजी हरियाणा विधानसभेच्या 90 जागांसाठी निवडणूक होणार असून 8 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे या पार्श्वभूमीवर भाजपाकडून आता 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रताप नड्डा, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये कुणाचा समावेश
- पंतप्रधान नरेंद्र मोदी
- जेपी नड्डा
- राजनाथ सिंग
- नितीन गडकरी
- अमित शहा
- नायब सिंग सैनी
- मोहनलाल बडोली
- मनोहर लाल खट्टर
- शिवराज सिंग चौहान
- धर्मेंद्र प्रधान
- योगी आदित्यनाथ
- सतीश पुनिया
- बिप्लव कुमार देव
- सुरेंद्र सिंग नगर
- पियुष गोयल
- अर्जुन राम मेघवाल
- हरदिपसिंग पुरी
- डॉ.सुधा यादव
- भजनलाल शर्मा
- डॉ. मोहन यादव
- पुष्कर सिंग धामी
- हिमंता बिस्वा सर्मा
- राव इंद्रजीत सिंग
- कृष्णपाल गुर्जर
- वसुंधरा राजे सिंधिया
- स्मृती इराणी
- जयराम ठाकूर
- रवनीतसिंग बिट्टू
- अनुराग ठाकूर
- दिव्या कुमारी
- हेमा मालिनी
- किरण चौधरी
- धर्मबीर सिंग
- नवीन जिंदाल
- अशोक तनवर
- मनोज तिवारी
- संजीव बल्याण
- कुलदीप बिष्नोई
- राम चंदर जांगरा
- बबिता फोगाट