दरवर्षी देशात आणि जगभरात कुठे ना कुठे तरी पुर, नैसर्गिक आपत्ती येतच असते अशीच घटना उत्तर कोरियामध्ये घडली आहे. उत्तर कोरियात आलेल्या महापुरामुळे एक हजारहून अधिक नागरिकांना आपला जीव लागला. अनेक जण जखमी झाले.
या महापुरामध्ये नीट कर्तव्य बजावलं नाही कामांमध्ये कसूर केला म्हणून उत्तर कोरियातील किंग जोम उन सरकारनं 30 अधिकाऱ्यांना दोषी ठरवत थेट फाशीची शिक्षा दिली आहे. ज्या तीस अधिकाऱ्यांना फाशी देण्यात आली त्यांची नावं अर्थातच जाहीर करण्यात आली नाहीत.
या प्रकरणी किम जोंग उन यांचं यासंदर्भात म्हणणं होतं, नैसर्गिक आपत्तीत ज्या नागरिकांचा मृत्यू झाला, ती घटना अतिशय दुर्दैवी होती, पुन्हा असं घडणार नाही, याची आम्ही पुरेपूर काळजी घेऊ. पुरामुळे जे काही नुकसान झालं, जी घरं पडली, त्या ठिकाणाची पुन्हा नव्यानं उभारणी करण्यासाठी सुमारे तीन महिन्यांचा कालावधी लागेल. या घटनेनंतर त्यांनी देशातील तीन प्रांतांना ‘स्पेशल डिझास्टर इमर्जन्सी झोन’ म्हणून घोषित केलं. या ठिकाणांवर आता विशेष लक्ष देण्यात येईल आणि त्यासाठी विशेष निधीचीही तरतूद करण्यात येईल.